श्रीगणेशोत्सवात 4 विसर्जन दिवसांमधील 21 टन 265 किलो निर्माल्यावर नैसर्गिक खतनिर्मिती


      यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टपासून साजरा करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकने सोशल डिस्टन्सींग राखले जाऊन गर्दी टाळण्यासाठी विभागवार 135 ठिकाणी कृत्रिम विस्रजन तलावांची निर्मिती केली आहे. या तलावांना स्वयंशिस्त जपत व पर्यावरणील दृष्टीकोन जपत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


       असाच पर्यावरणपूरक उद्देश नजरेसमोर ठेवून श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे 'ओले निर्माल्य' तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे 'सुके निर्माल्य' ठेवण्यासाठी 22 मुख्य व 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.


      अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला गतवर्षीप्रमाणेच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी 5 टन 210 किलो, पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 2 टन 255 किलो, गौरींसह सहाव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 11 टन 645 किलो तसेच सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 2 टन 155 किलो अशाप्रकारे चार दिवसात 21 टन 265 किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.


      स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यातील सर्वप्रथम व देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस लाभला आहे. यामध्ये जागरूक स्वच्छताप्रेमी नागरिकांचे बहुमोल योगदान आहे. हेच स्वच्छताप्रेम गणेशोत्सवातही नागरिकांकडून दिसून येत असून विसर्जनस्थळी योग्य कलशांमध्ये ओलो व सुके निर्माल्य ठेवले जात आहे. दि. 1 सप्टेंबर रोजी दहाव्या अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणा-या विसर्जन सोहळ्यासाठीही नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून नागरिकांनी स्वयंशिस्त राखत आत्तापर्यंत ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच अनंत चतुर्दशीदिनी होणा-या विसर्जनप्रसंगीही करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


Popular posts
बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 24 लाखांचा ऐवज जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
Image
मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं' .अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!
Image
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट
Image
विनापरवाना रेतीचा उपसा करून विकणाऱ्या रेती माफियांच्या अर्नाळा पोलिसांनी केला पर्दाफाश व केली कारवाई
Image
तोतया पत्रकाराच्या मदतीने गुन्हेगाराला हाताशी धरून पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात षडयंत्र
Image