सन २०११ पासुन पाहिजे असलेला नालासोपारा परिसरातील कुख्यात आरोपीस अटक


सन २०११ पासुन नालासोपारा पोलीस ठाणे तसेच तुळींज पोलीस ठाणे चे अभिलेखावर पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नामे रवि प्रेमसिंग बिडलान वय-२८ वर्षे, रा.आचोळे डोंगरी आदर्श नगर पडखळ पाडा नालासोपारा पुर्व ता वसई जि. पालघर हा नालासोपारा पुर्व आचोळे डोंगरी परिसरामध्ये सामान्य जनमानसांमध्ये दशहत व भितीचे वातावरण पसरवत होता. श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे सुचनेप्रमाणे श्री. विजयकांत सागर,  अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग व श्री. अमोल मांडणे, उपविभागिय पोलीस अधिकारी, नालासोपारा यांनी सदर पाहीजे आरोपीत याचा शोध घेवुन अटक करणेबाबत सुचना दिलेल्या  होत्या. त्या अनुषंगाने श्री. डी. एस. पाटिल वरीष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप व्हसकोटी व स्टाफ यांना पाहीजे आरोपी रवि प्रेमचंद बिडलान यास तात्काळ अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिजे आरोपी यास आचोळे भिमडोंगरी येथे गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळवुन त्याचा पाठलाग करुन अतिशय शिताफीने पकडले आरोपी यास दि. ०७/०८/२०२० रोजी अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपीत याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई तुळींज पोलीस ठाणे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी एस पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, सहाय्यक फौजदार शिवानंद सुतनासे, पाो.हवा./युवराज जावळे पो.ना/आनंद मोरे, पो.ना/संदीप शेरमाळे, पो.ना/शेखर पवार, पो.ना/प्रशांत सावदेकर, पो.कॉ/ सुखराम गडाख, पो.कॉ/योगेश नागरे, यांनी केली आहे.


Popular posts
बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 24 लाखांचा ऐवज जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
Image
मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं' .अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!
Image
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट
Image
विनापरवाना रेतीचा उपसा करून विकणाऱ्या रेती माफियांच्या अर्नाळा पोलिसांनी केला पर्दाफाश व केली कारवाई
Image
तोतया पत्रकाराच्या मदतीने गुन्हेगाराला हाताशी धरून पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात षडयंत्र
Image