निवृत्त पोलीस अधिका-याचे ३८ लाख लाटण्याचा डाव
ठाणे, फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अफसर इद्रिस खान याला हाताशी धरून ‘अकेला’ या वाद्ग्रस्त बोगस पत्रकाराने ठाणे पोलीस दलातील अधिका-यांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याची माहिती हाती आली आहे. गुन्ह्याचा तपास करणा-या पोलीस अधिका-याला बदनाम करून फसवणूक झालेल्या निवृत्त पोलीस अधिका-याचे ३८ लाख रुपये हडप करण्याचा या टोळीचा डाव आहे.
प्रसंगी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणा-या पोलीस दलातील काही अधिका-यांची हेतुपुरस्सर पद्धतीने बदनामी करण्याचे षडयंत्र ‘अकेला’ हे टोपण नाव घेऊन वावरणा-या तोतया पत्रकाराने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केले आहे. मुंबई ठाण्यातील पोलीस अधिका-यांच्या हितशत्रूंच्या इशा-यांवरून या सुपारीबहाद्दर पत्रकाराने कपोलकल्पित वृत्त सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरक्षक राजकुमार कोथमीरे यांच्या विरोधातही खोडसाळ वृत्त प्रसिध्द केली जात असून त्यासाठी ‘अकेला’ने चक्क गुन्हेगारांची साथ घेतली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त महादेव कृष्णा काकडे यांच्या मुलगा किरण हे मे. आदिविनायक इंटरप्रायजेस ही कंपनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय करते. राबोडीच्या क्रांतीनगर येथे राहणा-या अफसार इद्रीस खान याने काकडे यांच्या मुलाशी संपर्क साधला होता. बँकेने जप्त केलेल्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून एकत्र काम करण्याची आँफर त्याने किरण यांना दिली होती. मार्च, २०१८ मध्ये दोन ट्रक स्वस्तात खरेदी करण्याचा प्रस्ताव अफसारकडून आल्यानंतर त्यासाठी ११ लाख रुपयांची प्राथमिक गुंतवणूक काकडे यांनी केली. मात्र, हे ट्रक दुस-याच व्यक्तीला विकल्याचे सांगत अफसारने ६ लाखांची परतफेड केली आणि उर्वरित पाच लाख रुपये टाटा कंपनीतील कामाचे टेंडर मिळविण्यासाठी गुंतवू असे सांगितले. या कामासाठी अफसारच्या सांगण्यानुसार काकडे यांनी आणखी २० लाखांची गुंतवणूकही केली. त्यानंतर पत्नीच्या आजारपणामुळे काकडे यांनी आपल्या मालकीचा डंपर अफसारच्याच माध्यमातून १८ लाख रुपयांना विकला. मात्र, ती रक्कमही अफसारने स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतली. अफसारने काकडे यांच्याकडून वेळोवेळी घेतलेली रक्कम ७१ लाख ८० हजार रुपये झाली होती. त्यापैकी ३३ लाख ६० हजार रुपये त्याने परत केले. उर्वरित ३८ लाख १९ हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करत होता. धक्कादायक बाब म्हणजे पुन्हा पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही त्याने दिली होती. फसवणूकीचे हे प्रकरण चिघळल्यानंतर काकडे यांनी २८ डिसेंबर, २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्त तसेच ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे त्याबाबतची तक्रार दाखल केली. त्याबाबतची सर्व कागदपत्रे आणि पुरावे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांच्याकडे सादर करण्यात आले होते.
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कोथमीरे यांनी अफसारला बोलवून घेतले होते. त्यावेळी त्याने पैसे घेतल्याची कबुली दिली आणि लवकरत ती रक्कम परत करू असे आश्वासनही दिली. मात्र, तिथून बाहेर पडल्यानंतर अफसार पसार झाला. लाटलेले पैसे परत करण्याऐवजी तो तुम्हाला जिवंत सोडणार नाही, हाय कोर्टात जाऊ अशा धमक्या तो काकडे आणि त्यांच्या मुलाला देऊ लागला. त्यामुळे कोथमीरे यांनी अफसार याला फोन केला. तेव्हा तो टोलवाटोलवी करू लागला. त्यामुळे कोशमीरे संतापले होते. अफसारने तोच फोन रेकाँर्ड केला आणि वादग्रस्त पत्रकार अकेला याच्याकडे दिला.
वास्तविक एका निवृत्त पोलीस अधिका-याचे लाटलेले पैसे परत मिळविण्यासाठी कोथमीरे प्रयत्न करत होते. परंतु, त्या रेकाँर्डींगचा आधार घेत पोलीस ब्लँकमेलिंग करत असल्याचे खोटोनाटे वृत्त अकेलाने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. गुन्हेगाराची पाठराखण करणारा हा पत्रकार पोलीसांची बदनामी करून त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करणयाचा डाव रचत आहे. काकडे यांच्याकडून लाटलेले ३८ लाख रुपये हडप करण्याचा या टोळीचा डाव आहे. त्यातला काही हिस्सा अकेला याला देण्यात आलेला आहे. गुन्हेगारांनी अशा पद्धतीने पोलीसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न धक्कादायक आहेत. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी या प्रवृत्तींना वेळीच ठेचून आपल्या अधिका-यांचे मनोबल वाढविण्याची नितांत गरज आहे. अन्यथा संभाव्य बदानामीच्या भितीपोटी पोलीसांना काम करणे अशक्य होईल असे मत वरिष्ठ अधिका-यांकडून व्यक्त केले जात आहे.