बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 24 लाखांचा ऐवज जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई


हिंगोली शहरालगत बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश आले या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता. ३) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.


हिंगोली शहरालगत एका घरात बनावट नोटांची छपाई सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी गोपनिय माहिती मिळविली. चिंचोलकर यांनी साध्या वेशात शहरलगत आनंदनगर भागात जाऊन खोली किरायाने घेण्याच्या बहाण्याने तीन दिवसांपासून पाळत ठेवली. त्यानंतर बनवाट नोटांची माहिती खरी असल्याचे लक्षात येताच पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अोमकांत चिंचोलकर, जमादार रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जून पडघन, वसंत चव्हाण, विजय घुगे, महिला पोलिस कर्मचारी आशा केंद्रे यांच्या पथकाने आनंदनगरात एका घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी १७ लाख ४७ हजार रुपये किंमतीच्या १००, २००, ५००, २००० रुपये किंमतीच्या बनावट नोटा, महालक्ष्मीच्या पितळी १३ मुर्ती, प्रिंटर, एक चारचाकी वाहन असा सुमारे २४ लाख ३० हजाराचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख), छायाबाई गुलाबराव भुक्तार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संतोष सुर्यवंशी यास अटक केली आहे.


दरम्यान, या दोघांनी खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट बनावट नोटा काही जणांना दिल्या आहेत. तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसेच धन सापडल्याच्या बहाण्याने महालक्ष्मीच्या पितळी मुर्ती सोन्याच्या असल्याचे सांगत फसवण्याचा त्यांचा डाव होता. पोलिसांनी आता त्याची अधिक चौकशी सुरु केली असून त्याने कोणाला बनावट नोटा दिल्या याची माहिती घेतली जात आहेत.


🔅संतोष सुर्यवंशी याच्यावर यापुर्वीही गुन्हे


या प्रकरणात संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) याच्या विरुध्द सन २०१७ मध्ये हिंगोली जिल्हयातील बासंबा पोलिस ठाणे, सन २०१८ मध्ये वाशीम तर सन २०१९ मध्ये बुलढाणा पोलिस ठाण्यात बनावट नोटा प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


Popular posts
मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं' .अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!
Image
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट
Image
विनापरवाना रेतीचा उपसा करून विकणाऱ्या रेती माफियांच्या अर्नाळा पोलिसांनी केला पर्दाफाश व केली कारवाई
Image
तोतया पत्रकाराच्या मदतीने गुन्हेगाराला हाताशी धरून पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात षडयंत्र
Image